Friday, June 20, 2008

SHEJ ARTHI OF SHIRIDI SAI


आरती :

ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।
निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली ।।
सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।।
ओंवाळूं 0 ।।
रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।।
ओंवाळूं 0 ।।सातसागरी कैसा खेळ मांडीला ।।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।।
ओंवालूं 0 ।।
ब्रहांडींची रचना दाखविली डोळां ।।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।।
सदगुरु (साई सदगुरु) भोळा ।। ओंवाळू ।।


आरती ज्ञानरायाची :

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।।
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।
कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ।।
प्रगट गुहृ बोले । विश्व ब्रहचि केलें ।
राम जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ।।

आरती तुकारामाची :
आरती तुकारामा । स्वामी सदगुरुधामा ।
सच्चिदानन्द मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ।।
राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिले ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग (उदकीं) रक्षिले ।।
तुकितां तुलनेसी । ब्रहृ तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरं । चरणीं मस्तक ठेविलें ।।
शेजारती:
जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।।
आळवितों सप्रेमें तुजला आरति घेउनि करीं हो ।।
जय 0रंजविसी तूं मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो ।।
भोगिसि व्याधी तूंच हरुनियां निजसेवकदःखाला हो ।।
धांवुनि भक्तव्सन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ।।
जय 0 क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
ध्यावी तोडी भक्त-जनांची पूजनादि चाकरी हो ।।
ओंवाळीतों पंच्राण, ज्योति सुमती करीं हो ।।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ।।
जय 0सोडुनि जाया दुःख वाटतें साई त्वच्चर णांसी हो ।
आज्ञेस्तव तव आशीप्रसाद घेउनि निजसदनासी हो ।।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो ।
उठवूं तुजला साइमाउले निजहित सादायासी हो ।।
जय 0
शेजारती:
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा साइनाथा ।
चिन्मय हें सुखधामा जाउनि देवा पहुडा एकांता ।।
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला ।बाबा चौक झाडीला ।।
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ।।
आतां 0पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्ती
नवविधा भक्ती ।।
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ।।
आतां 0 भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला ।
बाबा काशीं टांगिला ।।
मनाचीं सुमनें करुनी केलें शेजेला ।।
आतां 0 द्घैताचें पाट लावुनि एकत्र केलें ।
बाबा एकत्र केलें ।दुर्बुद्घीच्या गांठी सोडूनि पडदे सोडीले ।।
आतां 0 आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला ।
बबा सांडुनि गलबला ।दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ।।
आतां 0अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुःशाला ।
बाबा नाजुक दुःशाला ।।
निरंजन सदगुरु स्वामी निजवीले शेजेला ।। आतां 0
प्रसाद मिळण्याकरितां
अभंग:
पाहें प्रसादाची वाट । घावें धुवोनियां ताट ।।
शेष घेउनी जाईन । तुमचें झालिया भोजन ।।
झालों आतां एकसवा । तुम्हा आळंवावो देवा ।।
तुका म्हणे आतां चित्त । करुनी राहिलों निश्चित ।।
समर्थ सद्गुरु सैनाथ महाराज की जय !!!